धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 25 सप्टेंबर 2025 रोजी एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ‌‘स्वच्छता ही सेवा' अभियान आणि ‌‘एक दिन, एक घंटा, एक साथ' राष्ट्र स्वच्छता उपक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.

या अभियानांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक मुक्त कॅम्पस आणि विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. प्रमुख उपक्रम आणि श्रमदान महाविद्यालयाने या निमित्ताने वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, कचरा व्यवस्थापन (विशेषतः प्लास्टिक), आणि जनजागृती रॅली अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. वृक्षारोपण: कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावली. श्रमदान आणि संरक्षण: विद्यार्थ्यांनी श्रमदान करून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले. तसेच, नव्याने लावलेल्या रोपांचे कीड, वाळवी, वन्य आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

स्वच्छता मोहीम: परिसराची स्वच्छता करून प्लॅस्टिकचा कचरा एकत्र करण्यात आला आणि त्याची योग्य विल्हेवाट लावून ‌‘प्लॅस्टिकचा वापर कमी करा' हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. मार्गदर्शन आणि नियोजन यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विक्रमसिंह माने यांनी उन्हाळ्यात झाडांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  एनएसएस चे प्रमुख श्री. डी डी मुंडे व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विविध विभागांनी विशेष प्रयत्न केले.

या यशस्वी आयोजनात बेसिक सायन्स आणि मेकॅनिकल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तेरणा अभियांत्रिकीमध्ये हा ‌‘स्वच्छता ही सेवा' अभियान अत्यंत उत्साहात आणि सामाजिक जाणीवेने संपन्न झाला. या हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी  समन्वयक म्हणून  यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top