धाराशिव (प्रतिनिधी)- सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.आज सकाळी 10 वाजल्यापासून 50 हजार क्युसेकवरून विसर्ग वाढवून 55 हजार 440 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता, सिना कोळेगाव प्रकल्प विभाग,परंडा यांनी दिली.
यामुळे सिना नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.