तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे सरसगट संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर विभाग प्रमुख गोरख माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                                                 

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांच्या शेतात दुष्काळ तसेच अतिवृष्टीमुळे शेतात अल्प पिके निघत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. नांगरणी, मोगडण, पाळी, बियाणे, खत, कोळपणी, डुबणे, खुरपणे, पिक काढणी, भरडणे तसेच दुबार पेरणीचे संकट यासाठी भरमसाठ रक्कम शेतकऱ्यांना खर्च करावी लागतो.शेतात भरमसाठ रक्कम खर्चूनही दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाया जाऊन शेतकऱ्यांनी शेतात केलेला खर्चही निघेनासे झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी आर्थिक सुबत्ता आलेली नाही.त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना परवडणारे झालेले नाही. पीक कर्ज घेतल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे.त्यामुळे शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत.शेतक-याना अर्थिक सुबत्ता येण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे सरसगट संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर विभाग प्रमुख गोरख माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top