धाराशिव (प्रतिनिधी)- वकील नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील शिवानंद फंक्शन हॉल धाराशिव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावर्षी संस्थेला निवड नफा रु 8,95,000/-( अक्षरी आठ लाख 95 हजार रुपये ) झाला असून पतसंस्थेच्या सभासदांना 10% लाभांश जाहीर केला आहे परंतु सभासदांच्या सर्वानुमते राज्यातील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये देण्यासाठी रु 2,51000/-( अक्षरी दोन लाख 51 हजार रुपये ) धनादेश देण्यात यावा असे जाहीर करण्यात आले पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अमोल वरुडकर होते संस्थेचे सचिव सौ माधुरी जाधव यांनी कार्या अहवाल सादर करताना धाराशिव उमरगा व भूम या शाखेचा लेखाजोखा मांडला ते म्हणाले संस्थेची यावर्षी 614 कोटीची उलाढाल झाली असून सभासदांना विविध गरजा भागविण्यासाठी 8 कोटी 46 लाख कर्ज वाटप केले आहे संस्थेचे अध्यक्ष व संचालक ॲड राजेंद्र शंकरराव धाराशिवकर ॲड रामचंद्र गरड ॲड रमेश वट्टे ॲड संजय बिराजदार ॲड अविनाश देशमुख ॲड मिलिंद पाटील व कार्यकारी संचालक सौ माधुरी जाधव व सभासद उपस्थित होते तसेच संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. त्या सर्व साधारण सभेने मंजुरी दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड राजेंद्र शंकरराव धाराशिवकर यांनी पुढील प्रगतीचा आढावा घेतला ज्येष्ठ संचालक ॲड मिलिंद पाटील यांनी सभेत मार्गदर्शन केले व अध्यक्ष ॲड अमोल वरुडकर यांनी संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.