धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि बी.पी.एस या नामांकित कंपन्यांच्या परिसर मुलाखतीचे दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी पात्रता 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर या नोकरीसाठी पात्र असेल. बँक ऑफिस ऑपरेशन -डेटा प्रोसेसिंग ट्रांजेक्शन या पदासाठी सदर मुलाखती होणार आहेत.या मुलाखतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना अत्यंत आकर्षक असे वार्षिक पॅकेज असणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखतीच्या अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.या नोंदणीसाठी पुढील लिंकचा वापर करावा आणि नोंदणी करावी. https://forms.gle/UqFbKvbbyjmZxpVGA अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे 9730961816 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले आहे.
डॉ. संदीप देशमुख पुढे म्हणाले की , वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कामाच्या संधी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत.त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत जात आहे.बेरोजगारी दूर करण्यासाठी महाविद्यालयाकडून अशा प्रकारच्या परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून नामांकित टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि बी.पी.एस. कंपनी या दोन नामांकित कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. महाविद्यालयामध्ये केवळ शिक्षण दिले जात नाही तर विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात असे देखील डॉ. संदीप यांनी म्हटले आहे. धाराशिव जिल्ह्यातील गरजू उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.