धाराशिव (प्रतिनिधी)- येथील लहुजी शक्ती सेना संघटनेचे राज्य प्रवक्ता प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांच्या शुभहस्ते सामाजिक कार्यकर्ते श्री सोमनाथ कसबे यांचा लहुजी चौक धाराशिव येथे सत्कार करण्यात आला.

सोमनाथ कसबे यांनी शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.लोंढे म्हणाले की, सोमनाथ कसबे यांचे कार्य अत्यंत मोठे आहे.अशाच प्रकारचे कार्य आपण सर्व लोकांनी मिळून केल्यास शिक्षणापासून वंचित असलेला वर्ग शिक्षण घेऊ शकेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  यावेळी प्रवीण खरबस, निकी गावचे सरपंच दादासाहेब मोरे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top