भूम (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी भूम तालुक्यातील बेलगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांना दोन जर्शी गाया आज त्यांना बेलगाव येथे पोहच केल्या आहेत.
तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या 10 गायी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या तर अठरा गायी जागेवर कोठ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्या होत्या त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते .धाराशिव जिल्ह्यातील नेते किराणा किट वाटप करण्यामध्ये मग नसताना सांगली जिल्ह्यातून माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत स्वतः तालुक्यामधील बेलगाव येथे दोन जर्शी गाई घेऊन येऊन दातखिळे कुटुंबीयांना सपुर्द केल्या आहेत .यावेळी बोलताना विश्वनाथ दातखिळे यांनी सांगितले की माझ्या गोट्यामध्ये गायी राहिल्या नाहीत.
पुराने वाहून नेल्या परंतु सदाभाऊ खोत यांनी माझ्यासाठी माझ्या गोट्याला गोठेपण आणले आहे .मी त्यांचा आभारी आहे .असे हवालदिल होत दातखिळे म्हणाले . सागर खोत यावेळी बोलताना इतर मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याचा उदरनिर्वाह दूध व्यवसायावर असल्यामुळे गायी ची मदत देणे योग्य आहे . त्याप्रमाणे सदाभाऊ खोत यांच्या सांगण्यानुसार दोन जर्शी गायी आम्ही देत आहोत .
यावेळी सरपंच जिनत सय्यद ,विश्वनाथ दातखिळे ,कोहिनूर सय्यद ,अलीम शेख, ॲड.संदीप ढगे पाटील ,ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय हराळ ,सचिन गायकवाड ,रोहित शिंदे,कृष्णा काशीद,जितेंद्र सूर्यवंशी,रोहन बाबर,समाधान मराळे,विश्वनाथ जाधव,मारुती चौबे,अर्जुन ईळे, श्रीराम दातखिळे, नारायण दातखिळे,विठ्ठल जाधव, रोहन जाधव, अतुल गोरे,गोवर्धन दातखिळे,धनंजय जाधव ,समाधान मराळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.