धाराशिव (प्रतिनिधी)- केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातर्फे सादर करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरील शोधनिबंधास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) या संस्थेचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या शोधनिबंधात देशातील सहकार क्षेत्रातील प्रथम पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाच्या गेल्या बारा वर्षातील वाटचालीचे सविस्तर तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे तांत्रिक सल्लागार श्री एस.एस. शास्त्री, कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्नी.) श्री टी.डी. गुंड यांचे मार्गदर्शनाखाली या शोधनिबंधाचे लेखन श्री किरण रमाकांत मोरे, चिफ इंजिनिअर यांनी केले आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) या साखर उद्योगातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंत्याच्या प्रमुख संस्थेच्या 69 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये या शोधनिबंधाचे सादरीकरण श्री किरण रमाकांत मोरे, चिफ इंजिनिअर यांनी केले होते. पुणे येथील J.W. Marriott येथे भरलेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन (इंडिया) च्या 70 व्या वार्षिक अधिवेशन व शुगर एक्स्पो मध्ये या शोधनिबंधास प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
श्री किरण रमाकांत मोरे, चिफ इंजिनिअर यांना हा पुरस्कार अरविंद गोरे, संस्थापक चेअरमन, ॲड. चित्राव अरविंदराव गोरे संचालक, ऋतूराज गोरे, श्री. एस.एस. शास्त्री तांत्रिक सल्लागार व टी.डी. गुंड जनरल मॅनेजर (टेक्नी.) यांचे प्रमुख उपस्थितीत मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे, कृषी मंत्री (महाराष्ट्र शासन), मा.ना श्री. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री (महाराष्ट्र शासन) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी दिनेश तावरे, सहकार व साखर आयुक्त महाराष्ट्र, विद्याधर अनासकर शिखर बैंक प्रशासक, एस.बी.भड, शिरगावकर, बोखारे, ठोंबरे बी.बी. व शेखर गायकवाड (माजी साखर आयुक्त) उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर कारखान्याच्या शोधनिबंधास देशपातळीवरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. एस.पी. डाके व सर्व संचालक मंडळ यांनी सर्वाचे अभिनंदन करुन देशपातळीवर होत असलेला संस्थेचा नावलौकीक असाच कायम ठेवुन सर्वाच्या सहकार्याने संस्था चांगले कार्य करीत राहील अशी हमी दिली आहे.