धाराशिव (प्रतिनिधी)- प्रा आ केंद्र येडशी उपकेंद्र आळणी गावात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबीर मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतिश हरिदास माता बालसंगोपन अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद गिरी यांच्या आदेशानुसार आरोग्य शिबीर आळणी गावात घेण्यात आले सदर शिबीराचे उदघाटन सरपंच श्री प्रमोद वीर,पोलीस श्री  पाटील प्रमोद माळी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री श्याम बापू लावंड, ग्रा. प सदस्य अक्षय श्री कदम,श्री अनंत खोबरे, श्री संतोष चौगुले, यांच्या शुभ हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले या शिबीरात एकूण 376 रूग्णाची विविध आजाराची व रोगाची आरोग्य तपासणी तज्ञ डॉ अश्विनी बलवंडे (स्त्री रोग तज्ञ) डॉ  अंजिक्य वढगणे (हृदय रोग तज्ञ) डॉ आकाश भाकरे ( अस्थिरोग तज्ञ) डॉ अमृता भाकरे ( बालरोग तज्ञ) डॉ वृशाली मस्के (दंतरोग तज्ञ) डॉ शिवरूपी इसाके (नेत्र रोग तज्ञ) वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा शिंदे  डॉ प्रणिता क्षिरसागर डॉ अमिना शेख डॉ विलास तोडकर डॉ बालाजी शिंदे डॉ मोटे रेणुका ब्लड बॅक डॉ संजय शिंदे डॉ बारकुल मॅडम व मानसोपचार तज्ञ यांच्या बीपी, शुगर, रक्तची तपासणी हृदयाची, तपासणी ईसीजी डोळे, नाक, कान, घसा, - सी बी सी एच बी, बालकांची तपासणी गरोदर माताची तपासणी, त्वचाची तपासणी , लसीकरण,गर्भाशय तपासणी, कुष्ठरोग रोग तपासणी मानसोपचार रूग्ण तपासणी, करण्यात आली व रक्त दान अवयव दान पण करण्यात आले तसेच ई की वाय सी, आयुष्यामान कार्ड,हि काढण्यात आले तसेच  शालेय पोषण आहार बदल समदोशन, हि अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून देण्यात आले  तसेच या वेळी सदर शिबीर यशस्वी श्री सुरेश गंगावणे आरोग्य सहाय्यक श्री एस पी कदम आरोग्य सहाय्यक श्री प्रशांत शिंदे आरोग्य सेवक श्री युवराज चौगुले आरोग्य सेवक  श्री राहुल पतंगे श्रीमती सावंत आरोग्य सेविका भारती  पौळ सुपरवायझर प्रमिला पवार आशा ताई कालिंदा कदम नंदा कदम शोभा गायकवाड यांनी सहकार्य केले आहे तसेच प्रा आ केंद्र येडशी  उपकेंद्र उपळा, शिंगोली, जवळे दु, कुमाळवाडी, अंतर्गत शिं तांडा, जा. वाडी तांडा, जाहगीदारवाडी, गड, या गावात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबीर घेण्यात आले आहे तसेच दि. 29/9/2025 रोजी येडशी येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबीरात विविध आजाराची व रोगाचे तपासणी तज्ञ डॉक्टर कडून घेण्यात येणार आहे तरी जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे यांनी केले आहे

 
Top