तेर( प्रतिनिधी ) राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक घेऊन आर्थिक तरतूद करून मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा अशी विनंती  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मराठवाडा हा अविकसित विभाग असून मराठवाड्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी मराठवाड्यातील उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे.उद्योग क्षेत्र वाढण्यासाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.मराठवाडयातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष आर्थिक तरतूदही करणे आवश्यक आहे.मराठवाडयात अतिवृष्टी होऊन खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.मराठवाडयात नदिकाठच्या जमिनी पावसामुळे खरवटून गेल्या असून शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे.पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे.मराठवाडयातील फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.मराठवाडयातील शेतक-यांना जीवन कसे जगावे या विचारात शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.मराठवाडयात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे पडून संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक घेऊन मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढावा व तातडीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top