तेर( प्रतिनिधी ) -  ग्रामीण डाकसेवकांच्या पाठीशी भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटना खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र व गोवा चे प्रदेश सचिव राजकुमार आतकरे यांनी केले.                      

भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघाचे तेर येथे पहिले अधिवेशन आयोजित कार्यक्रम प्रसंगी राजकुमार आतकरे बोलतं होते.अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही.व्ही.गोवर्धन होते. तर भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचे छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे सचिव विजय जाधव,पोस्टल कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सचिन जोगदंड, नरहरी बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विजय जाधव,व्ही.व्ही.गोवर्धन , अमोल जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक गोरख मरगणे यांनी केले तर सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र देडे,शुभम धुळशेटे व भारतीय ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.


 
Top