धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सुधीर पाटील यांच्या संकल्पनेतून पालक मेळाव्याचे आयोजन इ .5 वी व 6 वीच्या विभागाच्या वतीने पर्यवेक्षक बालाजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .

इ 5 वी व 8 वीच्या  सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना व पालकांना घटक चाचणी परीक्षा पहिलीच्या  सर्व विषयाच्या  उत्तरपत्रिका दाखविल्या तर पालकांनी आपल्या पाल्याची झालेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व  आपल्या पाल्याच्या अभ्यासाविषयीच्या अडचणी संबंधित वर्गशिक्षकांना व विषय शिक्षकांना सांगितल्या.

या पालक मेळाव्याला विशेष उपस्थिती संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी पालकांशी संवाद करून आपणास कांही अडचणीबाबत विचारणा केली.  यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम ,पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, बालाजी गोरे, सुनील कोरडे, श्रीमती बी.बी. गुंड उपस्थित होते.या पालक मेळाव्याला  विद्यार्थ्यांसह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला .

 
Top