भुम (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा (मुले) मध्ये शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत अनिकेत भारती,सुहास बाबर,साहिल जरडकर,हर्षद बाबर,अथर्व वसकर,जगदीश काळे,शंकर मस्कर,तुषार सुरवसे,ऋतिक बनसोडे,संजय काळे, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. एस. एस. शिंदे सर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ. तानाजी बोराडे सर, यांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रा. सूर्यवंशी सर, प्रा. जगदाळे सर, प्रा. राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top