तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारी आकडेवारीत या योग्य पावसाची नोंद होत नसुन, उम जुना, नादुरुस्त आणि बिघाडलेला पर्जन्यमापक यंत्र यास कारणीभूत असल्याचा आरोप करणारे निवेदन थेट पालकमंञी यांना मंगरुळ सर्कल मधील शेकडो शेतकऱ्यांनी दिले आहे
निवेदनात म्हटले आहे कि सध्याच्या होत असलेल्या पावसामुळे शेतात पिकं वाहून गेली, पण यंत्रावर पावसाची नोंद कमी लागते. त्यामुळे मदतीपासून आम्ही वंचित राहत आहोत तरी आजवर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.दोषी यंत्र काढून टाकून नवं यंत्र बसवावं.चुकीच्या पद्धतीने केलेल्या पावसाच्या नोंदींची चौकशी व्हावी. अशी मागणी करुन निवेदनासोबत शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे फोटो जोडले असून, तहसीलदारांनाही याबाबत निवेदन दिलं आहे.