धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आले .

प्रथम मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढयातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुत्र बुबासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज गीत, महाराष्ट्र गीत व मराठवाडा मुक्ती संग्राम गीत संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या चमूने सादर केले. त्यानंतर एन .सी.सी प्रमुख ए .व्ही .शेंडगे व स्काऊट गाईड प्रमुख व्ही .एम  शेवाळे यांच्या संघाने  राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .

यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून दाखवताना धाराशिव जिल्हयातील स्वातंत्र्यसेनानीचा लढा अधोरेखित केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सदस्य पी .एल. गाडे, के .के .जाधव, संतोष कुलकर्णी ,मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्यद्यापक प्रमोद कदम ,पर्यवेक्षक यशवंत इंगळे ,सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे ,श्रीमती बी .बी . गुंड व सेवानिवृत्त शिक्षक विक्रम सांडसे , अरुण बोबडे, गाढवे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य के .टी . पाटील सरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाचे आभार उप मुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले तर ' वंदे मातरम ' या गीताने कार्यक्रमाचे सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील, श्रीमती जयमाला शिंदे यांनी केले.  या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी नाईक सुहास ताटे व त्यांच्या टीममधील सदस्यांचे  सहकार्य लाभले.

 
Top