तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील चिवरी आरळी ब्रु शिवरस्ताची पवनचक्की कंपनीचे जड वाहने जावुन दुरावास्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या शेती कसणे कठीण बनल्याने या रस्त्यावर असणाऱ्या पवनचक्की कंपनी विरोधात योग्य कायदेशीर कारवाई नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत. या भागात असणारी पवनचक्की कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे या रस्त्यावर असणाऱ्या पवनचक्की तयार करण्यासाठी या ' रस्त्यावर वरुन जड वाहने गेले त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यातच पावसामुळे हा रस्ता आणखी खोल झाला आहे. सदरील रस्त्यावर असणाऱ्या पवनचक्की कंपनीचे लोक रस्ता दुरुस्ती करतो म्हणतात माञ करीत नाही सदरील पवनचक्की या तुन पैसे कमवते माञ हे करताना शाषणाने शेतकरी वर्गासाठी उपलब्ध करुन दिलेल्या रस्ताचा कसाही अतिवापर शेतकऱ्यांना शाषणाने दीलेल्या सोयीसवलतीची वाट लावते आधीच पावसाचा नैसर्गिक संकटाने ञस्त झालेला शेतकऱ्यांन वर रस्ता खराब झाल्याने शेती कसणे खराब झाले. या शेतकऱ्यांच्या नुकसानीस पवनचक्की कंपनीस जबाबदार धरुन त्याचावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सरकारी बाबु शासन कारवाई करते कि शेतकऱ्यांना वा-यावर सोडते हे लवकरच कळणार आहे.