तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे शिक्षकदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जळकोट गावचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.

जिल्हा परिषद प्रशालेच्या सहशिक्षिका पुष्पलता कांबळे, प्राथमिक शाळा (मुलांची ) येथील मुख्याध्यापक जगन्नाथ शिंदे, प्राथमिक शाळा (मुलींची ) येथील सहशिक्षिका सुरेखा राठोड व मिना बनसोडे  यांचा शिक्षकदिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना शाल ,फेटा, पुष्पगुच्छ व फूलांचे रोपटे देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश पिसे तर आनंदेश्वर हायटेक नर्सरीचे संचालक अमोल इगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना प्रशांत नवगिरे यांनी शिक्षकांनी समाजासाठी केलेल्या योगदानाला महत्व देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात व त्यांना योग्य मार्ग दाखवतात. असे सांगुन शिक्षकांचा त्याग व परिश्रमाची जाणीव करून देऊन शिक्षकदिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top