मुरुम (प्रतिनिधी) - येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्म दिवस हा शिक्षक दिन शुक्रवारी दि. 5 सप्टेंबर रोजी व्याख्यानाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. नरसिंग कदम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् : व्यक्ति आणि विचार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. अरुण बावा, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. सुजित मटकरी, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. विलास खडके, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. सुभाष हुलपल्ले, लालाअहमद जेवळे, इसाली चाऊस, चंद्रकांत पुजारी, व्यंकट मंडले आदिंसह विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश मोटे तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले.