तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग धाराशिव व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आदी राज्यातून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्र मध्ये पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तासाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शनिवार दि.20 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर मोफत उपचार केंद्र सुरू करण्यात आले.
या उपचार केंद्राचे उद्घाटन सरपंच गजेंद्र कदम यांच्या हस्ते व माजी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच प्रशांत नवगिरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित कवठे शिवसेनेचे कृष्णात मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम, संतोष वाघमारे अनिल भोगे यांच्यासह आरोग्य कर्मचारी अंकुश झुबंडे, अण्णासाहेब कोळगे, स्वप्नील मोगरकर, राहुल गायकवाड, ताहीर सरवदे, नारायण कदम व महादेव धरणे उपस्थित होते.