तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जागृत श्री नागनाथ महाराज देवस्थानात रविवार दि.21 सप्टेंबर रोजी दसरा अमावस्या निमित्त खर्गे सद्गुरु स्वामी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक जलाभिषेक करून श्री. नागनाथ महाराजांच्या भजनामध्ये महारती करण्यात आली. श्री.नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद व्यवस्थापनासाठी राजकुमार माने. चंद्रकांत गाभणे. रघुनाथ ढोकळे. दादासाहेब काडगावकर. बालाजी फंड. बाळकृष्ण गवळी. चंद्रकांत भालेकर. यांच्यासह ग्रामस्थ अन्नदान सेवा समिती कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
गवळी परिवाराकडून टेबल अर्पण
श्री. क्षेत्र नागनाथ देवस्थान अन्नक्षेत्रास हैदराबाद-गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय नागनाथ भाऊ गवळी यांच्या स्मरणार्थ गवळी परिवाराकडून बफे टेबल देवस्थानास अर्पण करण्यात आले. यावेळी सयाजी धनाजी गवळी यांनी टेबल मंदिराचे खर्गे सद्गुरू स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले.