भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.  त्यांच्या घरांचे आणि  साहित्याचे मोठं प्रमाणात नुकसान झालेले आहे. माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चाने  भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांसाठी गावागावात तातडीने सर्व जीवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे.

 या जीवनावश्यक साहित्यामध्ये कपडे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि किराणा सामानाचा समावेश त्याचबरोबर पांघरण्यासाठी ब्लँकेट व  औषधे सुद्धा दिलेली आहेत. कोणताही  पूरग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी आमदार तानाजीराव सावंत पूर्णपणे घेत आहेत. जेव्हा जेंव्हा मतदार संघातील नागरीकांवर संकट कोसळत आहे तेंव्हा आमदार तानाजीराव सावंत हे विठ्ठलासारखे धावून आलेले दिसत आहेत.  मतदार संघातील प्रत्येक नागरिक सुरक्षित कसा राहील याची सुद्धा काळजी आ.सावंत घेत आहेत. 

अनेक राजकीय व्यक्ती येतात भेट देतात पण आमदार तानाजी सावंत हे स्वतः जातीने लक्ष देऊन आमची लहान मुलांप्रमाणे काळजी घेत आहेत. आम्हाला लागेल ते साहित्य पुरवत आहेत असे नागरिकांनी बोलताना सांगितले. आमदार तानाजीराव सावंत यांचे शिलेदार पूरग्रस्त गावात गुडघाभर चिखलातून मार्ग काढत नागरिकांपर्यंत मदत पोहोच करत असून नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.


यां गावात केली मदत 

जयवंतनगर, माणकेश्वर, इडा, अंतरगाव, साडेसागवी

 
Top