धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये इ.5 वी व 6वी ची राष्ट्रीय नवनीत चित्रकला स्पर्धा 2025 (मास्टर स्ट्रोक) अवकाशातील शहर , माझी अभ्यासाची आदर्श खोली, भारतीय सण उत्सव या विषयावर चित्रे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहात रेखाटून रंगवून संपन्न झाली .यास प्रशालेचे मुअ नंदकुमार नन्नवरे, उपमुअ प्रमोद कदम, पर्यवेक्षक बालाजी गोरे यांचे सहकार्य लाभले तसेच छायाचित्र व चित्रण सहकारी शिक्षक धम्मपाल ओव्हाळ यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्याध्यापक शेषनाथ वाघ यांनी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.


 
Top