भूम (प्रतिनिधी)-  मागील आठ दहा दिवसापासून पडत असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना बेगलोरचे उद्योजक शंकर नागरगोजे यांच्याकडून किराणा किटचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील जयवंत नगर, आंबी ,बेदरवाडी, पाथरूड या गावांमध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्यांचे होणारे नुकसान भरून काढता येत नाही .परंतु घरातील साहित्य पूर्णपणे पाण्याने भिजले आहे .अन्नदानाची नासधूस झाली आहे. त्याच्यासाठी जयवंत नगर, बेदरवाडी, अंबी, पाथरुड गावातील शंभर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक शंकर नागरगोजे, प्रल्हाद आढागळे, विनोद नाईकवाडी, विहंग कदम, भगवान बांगर, दिपक मुळे, श्रीराम नागरगोजे, अनिकेत नागरगोजे, नारायणन मोराळे, नामदेव नागरगोजे, नवनाथ नागरगोजे त्यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. पाथरूड आणि परिसरात भरपूर पाऊस झाला आहे. नदीकाठच्या लोकांच्या घरात पाणी वाहून गेले आहे. शेतातील पिके वाहून गेले आहेत. नदीकाठच्या लोकांची भयानक परिस्थिती आहे. त्यांच्यासाठी अत्यावश्यक वस्तूंची किट पाच गावांमध्ये वाटप केली आहे. आमच्यासारख्या जो कोणी लोक असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहून मदत करावी व शासनाने लवकरात लवकर या भागातील शेतकऱ्यांना मदत द्यावी.असे बेंगलोर येथील उद्योजक शंकर नागरगोजे यांनी सांगितले.

 
Top