तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधी करण्यासाठी महसुल चे कर्मचारी जीवन मोहनराव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी होमावर धार्मिक विधी करण्यासाठी महसुल कर्मचारी संभाजी शिंदे ची नियुक्ती करण्यात येत होती ते सेवानिवृत्त झाल्यानंतर हा मान जीवन मोहनराव वाघमारे यांच्या कडे आला असुन ते अनेक वर्षापासुन होमावर धार्मिक विधी करतात.