धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1369 शेतकऱ्यांवर थकीत कर्जापोटी 101 ची कारवाई करण्याची नोटीस दिली असून, यामध्ये जमीन जप्त करण्याची तरतुद करण्यात आली आहे. ही घटनामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. मदत तर नाही, सदर प्रक्रिया तत्काळ मागे घ्याची  अशी मागणी  आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री नुकतेच अतिवृष्टी भागाचा दौरा करून गले. त्यावेळी फडणवीस यांनी टंचाईमध्ये ज्या उपाययोजना लागू केल्या जातात त्या उपाययोजना लागू केल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. अतिवृष्टी झालेल्या सात-आठ गावात शेतकऱ्याना 100 कारवाई अंतर्गत जमीन जप्तीची नोंटीस जिल्हा बँकेने पाठविली आहे. आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन आदेशात का रूपांतर करत नाहीत. अशा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करा. कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ आहे. नाहीतर शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला. 


उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ करावी

राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 31 जिल्ह्यामध्ये शेती व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना शैक्षणिक शुल्क भरणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


 
Top