नळदुर्ग (प्रतिनिधी)-  नळदुर्ग येथे ईद-ए-मिलाद सण( पैगंबर जयंती) रॅली व मिरवणूक व जामिया निजामिया युनिव्हर्सिटी हैदराबाद चे शेखूल हदीस हाफेज सय्यद सगीर अहेमद जहागीरदार व अल्लामा मौलाना सय्यद अहेमद नक्शबंदी  यांच्या धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

सर्वप्रथम 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता  शहरातील क्रांती चौक येथून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, हाफेज सय्यद मैनोद्दीन जागीरदार, ईद-ए-मिलाद कमिटीचे अध्यक्ष हाफेज सय्यद  नियामतुल्ला  इनामदार, आलेम मोहम्मद रजा  यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून मोटरसायकल व रिक्षा रॅली सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये मोटार सायकलस्वार, रिक्षा चालक व हातात झेंडे घेऊन लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. बस स्थानकासमोर रॅली आल्यानंतर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित फातेहाखानीच्या कार्यक्रमानंतर तबरूक (महाप्रसाद) चा वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर रहीम नगर, ख्वाजा नगर, इंदिरानगर, व्यास नगर, नानिमा रोड येथील देखावे मिरवणुकीसह आसार मस्जिद येथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता जुलूस ए मोहम्मदीच्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. 

तसेच तंझीम अबुल बरकात कमिटीच्या वतीने हाफेज सय्यद सगीर अहेमद जागीरदार यांचा धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जुलूस मध्ये देखावे सादर करणाऱ्यांना ट्रॉफी व इनाम देऊन सन्मानित करण्यात आला.  ईद-ए-मिलाद शांततेत साजरा व्हावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, आनंद कांगुणे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते, जीविशाचे अमर जाधव बालाजी शिंदे यांनी चोख  बंदोबस्त ठेवण्यात ठेवला होता. जुलूस मिरवणुकीतील देखावे चावडी चौकात आल्यानंतर देखावे तयार करणाऱ्या विविध कमिटीच्या मान्यवरांचा तसेच ईद-ए-मिलाद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा  सत्कार नगरपरिषद प्रशासन व काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष  धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी, इमाम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकीय सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
Top