धाराशिव (प्रतिनिधी) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नवनियुक्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हा संपर्क नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक दिनेश दत्ता बंडगर यांनी दिली आहे.
खासदार संपर्क कार्यालय स्वर्गीय पवन राजे कॉम्प्लेक्स येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आढावा बैठकीनंतर धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी श्री.दानवे करणार आहेत.
या बैठकीसाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, महिला आघाडी पदाधिकारी, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका संघटक, तालुका सचिव, शहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्यासह शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनाच्या पदाधिकार्यांनी तसेच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.