धाराशिव (प्रतिनिधी) - ग्रामदैवत धारासूरमर्दिनी देवी मंदिरात सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी इंद्रसेनसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना होवून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. नवरात्र उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त धारासूरमर्दिनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्र काळात पहाटेपासून भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवात शहरातील विविध महिला मंडळांच्या वतीने महिला भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मंदिर समितीचे सचिव बाळासाहेब यादव, उपाध्यक्ष पोपट शेरकर, सदस्य शैलेश कदम, उमेश राजेनिंबाळकर, अक्षर राजेनिंबाळकर, पलय काकडे, सात्विक यादव, आदर्श साळुंके इतर सदस्य तसेच भाविक उपस्थित होते.