धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रा. डॉ. गोविंद कोकणे, समन्वयक, वसंतराव काळे स्वाभिमान शिक्षण योजना, डॉ. गणेश शिंदे, अमोल चव्हाण, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.