धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,धाराशिव येथील सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या उद्घाटन सोहळ्याचा आणि अभियंता दिनाचा उत्साही कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. 15 सप्टेंबर हा दिवस भारताचे महान सिव्हिल अभियंता डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीस समर्पित केला जातो आणि त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजा-अर्चनेने झाली. प्रमुख पाहुण्यांमध्ये इं. सी. एस. इंगळे सल्लागार अभियंता, इं. बी. एन. भांगे बांधकाम अभियंता / संचालक, ड्रीम पिक्सेल कॉम्प्युटर्स, धाराशीव, आणि प्रा. कोठमळे सर, जी. पी. उस्मानाबाद यांची उपस्थिती लाभली होती. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने व तसेच या कार्यक्रमात सर्व विभागाचे प्रमुख प्रा. शितल पवार(स्थापत्य) डॉ. डी.डी. दाते (यांत्रिकी), डॉ . पी. एस कोल्हे (इ.टी.सी.), डॉ. यू.के. वडणे( बी. एस. एच .), प्रा.एस जी. गायकवाड (संगणक), प्रा.पी.एम.पवार (ए आई डी एस), प्रा. सुनीता गुंजाळ (ग्रंथपाल), प्रा.अशोक जगताप (टी पी ओ) प्रा.डी. एच निंबाळकर (डी ए सी), व तसेच स्थापत्य विभागाचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत नवीन सेसा कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नेतृत्व, टीमवर्क आणि एकात्मतेच्या भावना जपण्याचा संकल्प केला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. प्रत्येक पदाधिकारी अध्यक्ष, सचिव, को-ऑर्डिनेटर आणि सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
संस्थेच्या ‘विश्व-वेध 2025' अंतर्गत टेक्निकल रिल्स, टेक्निकल प्रेझेंटेशन, पोस्टर स्पर्धा व मिनी प्रोजेक्ट अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग व यशाची दखल घेण्यात आली. बोगद्यामध्ये अचानक बोगदा कोसळल्यानंतर सुरक्षित बोबद्यामधील सर्वांची सुटका करण्याच्या उपाययोजना सादर केलेला प्रोजेक्ट हा या उपक्रमांमधील विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन वैष्णवी काळे (अंतिम वर्ष सिव्हिल) आणि सायली सोनवणे (द्वितीय वर्ष सिव्हिल) यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना संघभावना, नेतृत्वगुण आणि सतत नवे काही करण्याचा सल्ला दिला. अशा कार्यक्रमांमुळे कॉलेजमध्ये सृजनशीलता, स्पर्धा आणि नेतृत्वाच्या संधी वाढतात असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि मार्गदर्शक मंडळींना अभिमान व प्रेरणा देणारी ठरला.