भूम (प्रतिनिधी)- येथील श्री चौंडेश्वरी नवरात्र उत्सव पूर्णपणे महिलांच्या पुढाकारातून सालाबाद प्रमाणे साजरा होत आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. दिनांक 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 कालावधीत यावर्षी नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भूम येथील नवरात्र महोत्सव महिला मंडळाच्या पुढाकार घेतला आहे.
या नवरात्र उत्सवा दरम्यान अखंड नामजप, विना प्रहर सेवेस प्रारंभ होणार आहे. सकाळी महाआरती, दुर्गा सप्तमी, पाठपठाण, नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सरस्वती पूजन करण्यात येणार आहे.
तसेच ललित पंचमीच्या दिवशी देवीच्या चरणावर श्री यंत्रावर कुंकुमार्चन, ललिता सहस्त्रनामाने होणार आहे. नवमीच्या दिवशी देवीच्या रूपात कुमारिका पूजन, ग्रामदेवता आई अंबाबाई मातेस मानसन्मान देऊन सवाद्य पालखीतून मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ होणार आहे. दररोज दोन ते चार महिला भजन, आराधी गित गायन कार्यक्रम, एक दिवस सामूहीक फराळाची पंगत, पौर्णिमे दिवशी सामूहिक महाप्रसादाच आयोजन, सायंकाळी दिपोत्सव, गोड मसाला दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा महाप्रसाद वाटप करून नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे .
या नवरात्र महोत्सवा दरम्यान 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या परिधान केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रथम प्राधान्याने पांढरा रंग, लाल रंग, निळा रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, राखाडी रंग, नारंगी रंग, मोरपंखी रंग व गुलाबी रंगाची साडी परिधान केली जाणार आहे.
नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठीच्या बैठकीवेळी चौंडेश्वरी नवरात्र उत्सव महिला मंडळ साधना सतीश कोकणे, सुलभा अभिमन्यू नवले, जयमाला धोंडीराम अलगट, मीरा संतोष गुरसाळी संगीता नाथ उपरे, स्मिता अतुल उपरे, सुचिता सुधाकर तारळकर, नंदाबाई विठ्ठल वारे, विद्या सुधीर बोत्रे यांची उपस्थिती होती. या महिलांचा प्रहार सेवेसाठी पुढाकार असणार आहे.