धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 1 मे 2025 ते 3 सप्टेंबर 2025 पर्यंत 824.56 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी एकूण 770.7 मिमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात 106 टक्के पाऊस झाल्यामुळे 1 मोठ्या सिंचन प्रकल्पासह 125 सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या संपली आहे. तर शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढविण्यासाठी या जलसाठ्याचा उपयोग होणार आहे. 

जिल्ह्यात एकूण 226 प्रकल्प असून, 1 मोठा प्रकल्प आहे. सिनाकोळेगाव हा मोठा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तर मध्यम व लघू 124 प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर 75 टक्केपेक्षा जास्त जलसाठा जिल्ह्यातील 19 मध्यम व लघू प्रकल्पात आहे. 50 ते 75 टक्के पेक्षा कमी जलसाठा 22 मध्यम व लघू सिंचन प्रकल्पात आहे. 25 ते 50 टक्के पेक्षा कमी जलसाठा 30 सिंचन प्रकल्पात आहे. तर 25 टक्केपेक्षा कमी जलसाठा मध्यम व लघू 19 सिंचन प्रकल्पामध्ये झाले. तर जोत्याच्या खाली 11 मध्यम व लघू सिंचन प्रकल्पात जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 576.942 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी सप्टेंबर 2024 मध्ये 45.19 टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. तर यावर्षी सप्टेंबर 2025 रोजी 79.16 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. 

 
Top