तुळजापूर (प्रतिनिधी)- एम.डी. ड्रग्ज प्रकरणात फरार असलेले प्रसाद उर्फ गोटन धोंडीराम कदम-परमेश्वर (34) रा. तुळजापूर व अर्जुन सुभाष हजारे (31, रा. उपळाई खुर्द, माढा) या दोघांना अंबाजोगाई येथे शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली आहे. सदरील कारवाई पालकमंञी दौऱ्यावर असताना झाल्याने ही कारवाई चर्चत आली आहे.
आतापर्यंत 38 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी 24 जणांना अटक, 8 जणांना जामीन, 2 पोलीस कोठडीत असून 5 आरोपी अजूनही फरार आहेत.