तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील केमवाडी येथे शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शाळकरी मुले-मुली पाण्यातून, चिखलातून वाट काढत प्रभातफेरीसाठी जाताना दिसली.

एका बाजूला देशाच्या स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन साजरा होत असताना, दुसऱ्या बाजूला या छोट्या मुलांना अजूनही रस्त्याऐवजी चिखल आणि पाण्यातून चालत शाळेत पोहोचावे लागत आहे. हे चित्र खूप काही बोलते.गावातील नागरिक, विद्यार्थी यांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष केव्हा दिलं जाणार? प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशीच कसरत करायची का?  ग्रामीण भागातील रस्ते कधी होणार असा सवाल विचारला जात असुन,  स्वातंत्र्य दिनी “स्वतंत्र” रस्ता नसलेला हा प्रवास खरंच विचार करायला लावणारा आहे.तरी  विद्यार्थ्यांनी मात्र चिखलात पाण्यातुन वाट काढीत  चेहऱ्यावर हसू ठेवून देशभक्तीची प्रभातफेरी पुर्ण  केली. पायाखाली चिखल असला तरी ग्रामीण भागातील विध्यार्थी देशप्रेमात कुठेच कमी नाही, हेच त्यांनी दाखवुन दिले.

 
Top