तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सरहद वर असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी (सर्वे नं. 399) येथील बोगस खत निर्मितीचा कारखाना गेल्या वर्षभरापासून खुलेआम सुरू असून, तो तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक, बोगस बियाणे, खते आणि औषधांमुळे आधीच अडचणीत असलेले शेतकरी आणखी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यास नोटीस दिल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता सदर तक्रार दाराचा तक्रार पार्श्वभूमीवर आम्ही 31/7/2025 ला भरारी पथक सह  कारखाना स्थळी गेलो होतो.तिथे जावुन आम्ही बारा सँम्पल रिपोर्ट घेतले असुन त्यांना या प्रकरणी नोटीस बजावुन दोन दिवसात नोटीस ला उत्तर देण्यास सांगितले आले. सदरील कारखान्यास विक्री बंद आदेश आहेत सदरील सँम्पल पुण्याला पाठवले असुन त्याचा अहवाल आठ दिवसात येईल अशी माहीती तालुका  कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी दिली.

 
Top