धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथील प्राचार्य तथा मुख्याध्यापक सूर्यकांत उर्फ बाळासाहेब मुंडे नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त प्रदीर्घ अध्यापन सेवेबाबत विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
प्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, सचिव धनंजय पाटील, उपप्राचार्य व्ही.के. देशमुख, आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक कचरू घोडके, पर्यवेक्षक अमोल दीक्षित, नंदकुमार गवारे, प्रशालेतील माजी प्राचार्य, उपप्राचार्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सपत्नीक पूर्ण पेहराव, शाल, बुके, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व श्री गुरुदत्ताचे शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. तर संस्थेने व शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून चांगले काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्राचार्य मुंडे यांनी ऋण व्यक्त केले. कार्यकमाचे प्रास्ताविक के. डी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन आण्णासाहेब कुरुलकर यांनी केले. तर आभार संभाजी भोसले यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व परिवारातील नागरिक उपस्थित होते.