तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातबोळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश रूपरूर व सिध्दाराम मुलगे यांनी काँग्रेस व भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. 

शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत अंकुश रूपरूर व सिध्दाराम मुलगे यांनी भगवा ध्वज हाती घेतला. पक्षाचे सचिव संजय मोरे, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिव सह संपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा करण्यात आला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

 
Top