तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीदेवी विजयग्रंथ सांगता निमित्त सिंहासन पूजा मंदीर संस्थानने राखीव ठेवावी अशी मागणी जय अंबिका मंडळाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देवुन केली.
शहरातील पुजारी बांधवाच्या भागातील शुक्रवार पेठ, खडकाळ गल्ली, कमानवेस व जवाहर गल्ली या भागात वारसांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार अनेक वर्षापासून आषाढ द्वादशीपासून भाद्रपद काला अष्टमी या कालावधीत श्री देवि विजयग्रंथ प्रवचन करण्यात येते. श्री तुळजाभवानी मातेसंबंधी सर्व माहिती या ग्रंथ असून भवानी मातेचा प्रचार व प्रार करण्यासाठी या ग्रंथाचे वाचन करण्यात येते' याचा वाचन सांगता दिनी पुजारी बांधव देविजीस सिंहासन पुजा व अन्नदान करतात परंतु सध्या सिंहासन पुजा आँनलाईन बुकींग ने केली जात नाही याच दिवशी नंबर येत नसल्याने ती राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.