धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती मायाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून साई नगर, मिली कॉलनी, रजा कॉलनी या ठिकाणी रस्त्यांवर स्वखर्चातून मुरूम टाकण्यात आले.

सदर भागातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. पावसामुळे ठिकठिकाणी चिखल व पाणी साठा निर्माण होऊन नागरिकांना चालणेफिरणे कठीण झाले होते. याबाबत नागरिकांनी तालुकाध्यक्ष मायाताई चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.

या तक्रारीची दखल घेत मायाताई चव्हाण यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तसेच पालकमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र नागरिकांच्या तातडीच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चातून संबंधित ठिकाणी मुरूम टाकून नागरिकांना दिलासा दिला. या उपक्रमावेळी महिला जिल्हा संघटक  किरणताई निंबाळकर उपस्थित होत्या.

 
Top