धाराशिव,(प्रतिनिधी)-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डाॅ. गणेश शिंदे यांनी प्रतिज्ञा वाचन केले. सर्वांनी प्रतिज्ञा दिनाची शपथ घेतली. यावेळी विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, प्रा. डाॅ. गोविंद कोकणे, समन्वयक,  वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजना, प्रा. डाॅ. मनिषा असोरे, विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र विभाग, डाॅ. गणेश शिंदे, डाॅ. जितेंद्र शिंदे, डाॅ. हर्षल ओमन,प्रा. काळे, प्रा. बारकुल, प्रा. चव्हाण, डाॅ. झाकडे,  प्रा. परिवर्तन जगझाप, अभियंता प्रवीण आळंगे, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, मल्लिनाथ लामजणे, तुकाराम हराळकर, संजय जाधव, श्रीकांत सोवितकर, सुधाकर राठोड, डिजीसेट ऑपरेटर धनराज सोमवंशी, किरण शिंदे,  अमोल चव्हाण, विद्यार्थी आदि उपस्थित होते.

 
Top