धाराशिव,(प्रतिनिधी)-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव जिल्ह्याचा जिल्हा अभ्यासवर्ग दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी एकलव्य विद्या संकुल, यमगरवाडी ता. तुळजापूर येथे संपन्न झाला. दोन दिवसीय अभ्यासवर्गामध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात जन नायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त प्रदर्शनी कक्षास भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले. प्रमुख अतिथी महंत मावजीनाथ, अभाविप धाराशिव शहराध्यक्ष प्रा. प्रशांत गुरव, शहर मंत्री कु. साक्षी पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. अभ्यासवर्ग उद्घाटन सत्र अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. डाॅ. सचिन कंदले, जिल्हा संयोजक कुमारी वैष्णवी थिटे व अभ्यासवर्ग प्रमुख जयराम गंभीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धाराशिव जिल्हा मा. संघचालक ॲड. रवींद्र जी कदम यांनी संघ शताब्दी या विषयावर भाषण केले. आदित्य पाटील यांनी अभ्यासवर्गाची व्यवस्था पाहिली. जिल्हा अभ्यासवर्गामध्ये विद्यार्थी विकास, नेतृत्वगुण, अभाविप कार्यपद्धती, कार्यकर्ता व्यवहार, मनोरंजन सत्र, महाविद्यालय सक्रियता, प्रवास व संपर्क इ. सत्र घेण्यात आले. अभ्यासवर्गाच्या समारोप प्रसंगी अभाविप धाराशिव जिल्ह्याची जिल्हा समिती घोषित करण्यात आली. जिल्हा सहसंयोजक अक्षय माळी, राजेश कवडे, जिल्हा कार्यालय प्रमुख उज्वल गाढवे, उमरगा तालुका संयोजक अभिषेक मिसाळ, सहसंयोजक पंकज बेळकोने, जिल्हा समिती सदस्य म्हणून अंबिका मोरे, ओमप्रसाद जाधव, अजय टोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
