परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयामध्ये दिनांक पाच व सहा ऑगस्ट 2025 रोजी विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ विभागाच्या भव्य पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पालक मेळाव्याच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे तर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.सचिन डॉक्टर, सचिन चव्हाण व मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ गजेंद्र रंदील यांची उपस्थिती असणार आहे. या पालक मेळाव्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील सर्व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची घटती उपस्थिती विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल पालकांची जबाबदारी या व अशा इतर बाबी या पालक मेळाव्यामध्ये उपस्थित केल्या जाणार आहेत. तेव्हा हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी बहुसंख्य पालकांनी आपली उपस्थिती दर्शवावी व आपल्या पाल्याचे भवितव्य यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपली उपस्थिती दर्शवावी असे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख यांनी माहिती दिली आहे.