धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छावा प्रतिष्ठानच्या वतीने शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आळणी (ता. धाराशिव ) : दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस या त्रिसंधी निमित्ताने छावा प्रतिष्ठान, आळणी यांच्यातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते सातवीतील 260 विद्यार्थ्यांना वही, पेन व शालेय उपयुक्त साहित्य मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविकामद्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य तिळक यांच्याविषयीं माहिती सांगितली तसेच प्रमुख पाहुणे श्री धर्मवीर बाबा वीर यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक तसेच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.

कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांच्यासह खालील ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. सरपंच प्रमोद काका वीर,अण्णासाहेब कदम, बाबासाहेब घाटे, महेश वीर, सिद्धेश्वर म्हेत्रे, धर्मराज सूर्यवंशी, युवराज पोळ, प्रसाद वीर, महेश कदम, माऊली वीर, अजित वीर, विनोद वीर, अविनाश कदम, निलेश नांदे, निलेश निंबाळकर, अजय निंबाळकर, रुपेश वाघमारे, बंडू कदम, विश्वजीत पाटील, संकेत वीर, निखिल वीर, शुभम गाडे, नागेश जाधव, रोहन घाटे, सागर साळुंखे, निलेश वीर,अजय देशमुख, ओमकार वीर, विशाल वीर तसेच छावा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी छावा प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश पेठे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती राधाबाई वीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीटीसाठी छावा प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकारी यांच्या सह सर्व शिक्षकांनी  सहकार्य केले.

 
Top