धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या शिवाई प्रतिष्ठान, धाराशिव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी ता. धाराशिव येथे  व्हाईट बोर्ड व एक सीलिंग फॅन भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन या पुढील काळामध्ये आणखीन दोन व्हाईट बोर्ड देण्याविषयी आवाहन केले त्यानंतर   कॉलेज च्या माजी प्राचार्या सुलभाताई देशमुख यांनी शिक्षकांना विद्यार्त्यांच्या गुणवत्ते विषयी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी प्रभावीपणे व आनंददायी शिक्षण देण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामध्ये संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई गरड,संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या देशमुख, मार्गदर्शक सौ. सुलभाताई देशमुख, प्रेमाताई पाटील, स्मिता पवार, नयना वाघ, सचिव सौ. आशा पाटील, उपसचिव सौ. राजश्री इंगळे, सौ. क्रांती बुकन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. व विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे या हेतूने करण्यात आलेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी ठरेल. तसेच  शाळेसाठी करण्यात आलेल्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व सुविधायुक्त होण्यास मदत होईल.असे मत व्यक्त केले. हनुमंत माने यांनी आभार मानले.

 
Top