तुळजापूर (प्रतिनिधी)-  “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांनी तुळजापूर शहराच्या रस्त्यांवर गुरुवार दि21 सायंकाळी वातावरण दणाणून गेले. लोकशाही रक्षणासाठी आणि जनतेच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल मार्चचे आयोजन करण्यात आलेहोते यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी हजर होते.

हा मशाल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाला. तो महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येवुन अभिवादन करुन, हातात मशाली, घोषणांनी गजबजलेले वातावरण आणि “मतदान चोरी विरोधात लढा” हा संदेश जनतेसमोर पोचविण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला पाठिंबा दर्शवला. “मतदान हा जनतेचा हक्क असून तो हिरावून घेण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही” असा इशारा मशाल मार्चमधून देण्यात आला. यात  शिवसेना आ प्रविण स्वामी  काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, अमोल  कुतवळ, धर्यशिल पाटील, अमर चोपदार, अर्जून सांळुके सह काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीकाँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिव आणि महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

 
Top