धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी सेंट्रल इक्युमेंट आयडेंटी रजिस्टर हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सदरचे पोर्टल धाराशिव जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस कार्यान्वित करण्यात आले असून फिर्यादी स्वतः आपली मोबाईल हरवल्याची तक्रार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवू शकतात. त्यामुळे धाराशिव पोलिस विभागाने चोरीस गेलेले 33 मोबाईल किंमत 5 लाख 3 हजार 431 रूपये शोधून काढून संबंधितांस मोबाईल परत करण्यास यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्हयातील हद्दीमध्ये सन 2024-2025 मध्ये चोरीस गेलेल्या, हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीसांनी सेंट्रल इक्युमेंट आयडेंटी रजिस्टर या पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी एकूण 33 मोबाईल किंमत 5 लाख 3 हजार 431 रूपये शोधून काढण्यात धाराशिव पोलीसांना यश आले आहे. सदर मोबाईल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, संभाजीनगर यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत फिर्यादींना परत करण्यात आले.
यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे पोनि शेख, पोशि सुर्यवंशी, पोशि अंगुले, कळंब पोस्टेचे पोशि नारळकर, नळदुर्ग पोस्टेचे पोशि दांडेकर व शहर पोस्टेचे पोशि क्षिरसागर यांनी केली आहे.