तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जलजीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गतच्या तुळजापूर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची चौकशी करण्याची मागणी माजी मंञी मधूकरराव चव्हाण यांनी पाणीपुरवठा स्वछता मंञी गुलाबराव पाटील यांच्याकडे पञ देवुन केली आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु असून ती कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेषत: आपसिंगा व काक्रंबा ही संयुक्त पाणीपुरवठा योजना असून निकषाप्रमाणे काम होत नसलयाबाबत तसेच करत असलेली कामे निकृष्ट होत असल्याबाबत दोन्ही गावच्या सरपंचानी लेखी पत्राव्दारे प्रशासनाकडे तक्रारी दिल्या असून आंदोलनाचा व उपोषणाचा इशारा दिलेला आहे. संबंधित योजना राबवणारे अधिकारी व कंत्राटदार हे लोकप्रतिनिधीच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून भ्रष्टाचार करीत आहेत. तरी कृपया उपरोक्त योजनेची वरिष्ठ व जबाबदार अधिकाऱ्यामार्फत चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी व योजनेचे काम योग्यरित्या करुन जनतेला कायमस्वरुपी योजनेचा लाभ होईल या दृष्टीने उपाययोजना करावी. अशी विनंती माजीमंञी मधुकरराव चव्हाण यांनी केली.