तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जमिनीची अधिकतम मर्यादा यातून भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने सिलिंग कायद्याद्वारे वाटप केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग - 2 मधून वर्ग -1 मध्ये रुपांतर करण्याची मागणी सिलींग जमीन धारक शेतकऱ्यांनी धाराशिव येथे महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देवुन केली. सदरील प्रकरणी तात्काळ बैठक घेवुन प्रश्न मार्गी लावण्याचा सुचना संबंधित अधिकारी वर्गास दिल्या. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, चेअरमन सुनिल चव्हाण उपस्थितीत होते.
निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर तालुक्यातील सुमारे 4,000 हेक्टर जमीन सिलिंग कायद्यानुसार भूमिहीन व गरीब शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. परंतु या जमिनी भोगवटदार वर्ग-2 प्रकारात असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजना, अनुदान, पिक विमा, नुकसान भरपाई, शेती अवजारे, बी-बियाणे, खते, पिक कर्ज इत्यादींचा लाभ मिळालेला नाही.तरी
महायुती सरकारने भोगवटदार वर्ग-2च्या जमिनींना नियमित वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला असला तरी, सिलिंग कायद्याअंतर्गत वाटप झालेल्या जमिनींना त्यातून वगळण्यात आले आहे.
या जमिनींवरच 10 हजार कुटुंबांचा उपजीविका, शिक्षण व आरोग्याचा खर्च अवलंबून आहे. मात्र शासनाच्या लाभांशिवाय शेतकऱ्यांचे हाल होत असून, जमिनीचा खरा फायदा मिळत नाही. तरी “आमच्या जमिनी त्वरित भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरित करा, अन्यथा शासनाचा हेतूच अपूर्ण राहील.” सदरील निवेदन विकास जाधव पाटील यांच्या मार्गदर्शन खाली दिले.