वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाशी तहसीलचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम उपस्थित होते.प्रमुख पाहुणे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी ध्वजारोहण केले.
यावेळी बोलताना मा.प्रकाश म्हेत्रे म्हणाले कि, स्वातंत्र्य नंतर आपल्या देशाने धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रप्रेमाला सर्वोच्च प्राध्यान्य दिले असून त्याच विचारसरणीवर आपण मार्गक्रमण करत आहोत.15 ऑगस्ट 1947 याच दिवशी भारताने ब्रिटिश सत्तेपासून कायमची मुक्तता मिळवली आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली. या स्वातंत्र्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, त्याग आणि मोठा संघर्ष दडलेला आहे. असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले कि, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशामधील असंख्य शूरवीरांनी बलिदान दिले ते बलिदान व्यर्थ जाऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.आपण त्यांचे ऋण विसरू नये आणि स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करून देशासाठी काम करायला हवे.आपण शिकून, प्रामाणिकपणे काम केले तर आपल्याला स्वतःची व देशाची प्रगती येईल.असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.डॉ अरुण गंभीरे यांनी केले तर क्रिडा विभाग प्रमुख प्रा.डॉ रवी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्राध्यापक वृंद,कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.