धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.15) 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजा रोहनानंतर राष्ट्रगीत गायीले गेले व भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला.जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन जगताप, धाराशिव शहर अध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव कळंब विधानसभा कार्याध्यक्ष विवेक घोगरे, सामाजिक प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, अकबर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वगरे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, बंजारा सेल जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, रोजगार सेल जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष सलीम पठाण, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, चिलवडी महिला जि प गटप्रमुख संगीता ढोकळे, वाघोली जि.प. महिला प्रमुख अज्जू शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.